अभिनेत्री मिथिला पालकर कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच मिथिलाने एले ब्युटी अवॉर्डला हजेरी लावली. या अवॉर्ड सोहळ्यात तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत हजेरी लावली. परंतु, मिथिलाचा हा ग्लॅमरस लूक नेटकऱ्यांना मात्र फारसा रुचलेला नसल्याचं दिसत आहे.
एले ब्युटी अवॉर्ड सोहळ्यातील मिथिलाचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. शॉर्ट ड्रेसवर खड्यांचा नेकलेसने फॅशन करत मिथिलाने अवॉर्ड सोहळ्यासाठी खास लूक केला होता. परंतु तिने परिधान केलेल्या ड्रेसवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
हेही वाचा >> Video: शालिन भानोतचं शिव ठाकरेने तोंड पकडलं, जोरात ढकललं अन्….; ‘बिग बॉस’च्या घरात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा >> “तिला वाटायचं मी बाथरुममध्ये मुलांबरोबर…” जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत
मिथिलाच्या अवॉर्ड सोहळ्यातील या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “या ड्रेसमध्ये ही कशी बसणार?” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत “आता उर्फी काय करणार”, असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने मिथिलाच्या ड्रेसची तुलना घरातील पायपुसणीबरोबर केली आहे. “सकाळपासून माझी आई विचारत आहे घरातील पायपुसणी कुठे गेली? आता समजलं. कधी कोणी घरातील केबल घेऊन जातं. काय चाललं आहे. यांना सांगा कोणीतरी”, असं त्याने कमेंट करत म्हटलं आहे.
हेही वाचा >> “सनी हे आमचं बाळ…” पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत हेमंत ढोमेने केलेली पोस्ट चर्चेत
कप सॉंगमुळे घराघरात पोहोचलेल्या मिथिलाने वेब क्वीन म्हणून ओळख निर्माण केली. मिथिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मिथिला ‘मुरांबा’, ‘कारवान’, ‘त्रिभंगा’ अशा अनेक चित्रपटांत झळकली आहे. तिने वेब सीरिज व मालिकांमध्येही काम केलं आहे.