अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका सकारात प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता त्यांनी शेअर केलेला एक अनुभव खूप चर्चेत आला आहे.

शूटिंगच्या शेड्युलमधून वेळ काढून मृणाल कुलकर्णी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकत्याच त्या एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनला फिरायला गेल्यावर तळलेले किडे खाल्लेले असं सांगितलं.

Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
Raj Thackeray Speech in Yavatmal
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणात पॅराग्लायडरच्या गिरक्या; वर पाहात म्हणाले, “हा माणूस…”
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन

आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

असा कोणता पदार्थ आहे जो अजिबात आवडला नाही, असा प्रश्न त्यांना विचारला गेल्यावर त्या म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती.”

हेही वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

दरम्यान, मृणाल कुलकर्णी जवळपास ९ वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्री महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.