अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका सकारात प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता त्यांनी शेअर केलेला एक अनुभव खूप चर्चेत आला आहे.
शूटिंगच्या शेड्युलमधून वेळ काढून मृणाल कुलकर्णी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकत्याच त्या एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनला फिरायला गेल्यावर तळलेले किडे खाल्लेले असं सांगितलं.
आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला
असा कोणता पदार्थ आहे जो अजिबात आवडला नाही, असा प्रश्न त्यांना विचारला गेल्यावर त्या म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती.”
दरम्यान, मृणाल कुलकर्णी जवळपास ९ वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्री महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.