वैदेही परशुरामी, सुमित राघवन व सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित ‘संगीत मानापमान’ चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. १० जानेवारी २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाचे मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने कौतुक केलं आहे.
मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर १८ नामवंत गायकांनी ही गाणी गायली आहे.
हेही वाचा – एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
मृणाल ठाकूरने हा चित्रपट पाहिल्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर या चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे. मृणालला हा मराठी चित्रपट आवडला आहे. तिने चित्रपटाच्या टीमचं पोस्टमध्ये कौतुक केलं आहे. “‘संगीत मानापमान’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! या चित्रपटातील गाणी जादुई आहेत. हा म्युझिकल चित्रपट पाहून खूप आनंद झाला. नक्की पाहा,” असं मृणालने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
पाहा पोस्ट
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावेने केले आहे.