मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बहिण गौतमी देशपांडेबरोबरचे मजेशीर व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. चाहत्यांचं सतत मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. निसर्गाच्या सानिध्यात छोटसं घर बांधलं असल्याचं मृण्मयीने मध्यंतरी एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. तिच्या या घराचं काम अजूनही सुरु आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ

मृण्मयीने हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत जागा खरेदी करत स्वतःचं एक घर असावं असं स्वप्न पाहिलं. तिचं हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. इतकंच नव्हे तर हे घर बांधण्यासाठी ती स्वतः हातभार लावत आहे. तिचा नवरा, बहिणही यासाठी तिची मदत करत आहेत.

मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कुदळ हातात घेऊन खड्डा खणताना दिसत आहे. तर तिचा नवराही तिला मदत करत आहे. स्वतःचं स्वप्नातलं घर उभं राहत आहे हे पाहून मृण्मयीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे.

आणखी वाचा – Video : “टिकली लावायची की नाही हे बाईला ठरवू द्या” झी मराठी वाहिनीने ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, “हिंदू धर्म…”

“फार्म हाऊसच्या अगदी मध्यभागी आम्ही आहोत. आमचं घर अगदी उत्साहाने भरलेलं आहे.” असं मृण्मयीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. तसेच घर खूप सुंदर आहे असंही कमेंट करत म्हटलं आहे.

Story img Loader