मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘फत्तेशिकस्त’, ‘चंद्रमुखी’, ‘नटसम्राट’ या चित्रपटांतून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतंच तिने नवीन घर बांधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या घराचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने “स्वप्न सत्यात उतरलं. जगायला काय लागतं? १०×२०ची आनंदी जागा आणि ज्याच्याबरोबर स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याचा हात…दोन वर्षांपासून झगडत आहोत. पण आता मिटल्या डोळ्यांमागचं स्वप्न डोळ्यांसमोर दिसतं आहे. अजून खूप मजल मारायची आहे. पण, एकावेळी एक पाऊल पुढे टाकत आहोत”, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> ‘आय लव्ह यू’ म्हणतानाच्या व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाचं स्पष्टीकरण, म्हणाली “तो व्हिडीओ…”

हेही वाचा >> करवा चौथच्या दिवशी मंगळसूत्राचं ब्रॅण्डिंग केल्यामुळे शिबानी दांडेकर ट्रोल, नेटकरी म्हणाले “तू संस्कृतीचा…”

मृण्मयीने तिच्या पोस्टमध्ये तिचा पती स्वप्निल राव यालाही टॅग केलं आहे. फोटोमध्ये प्लास्टर न केलेलं मातीच्या विटांचं घर दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मृण्मयीची बहीण गौतमी देशपांडेही अभिनेत्री आहे. मृण्मयी आणि गौतमीने मिळून ‘नील मोमो’ हा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रॅण्ड सुरू केला आहे. मृण्मयी देशपांडे ‘बेभान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mrunmayee deshpande new home shared photo on social media kak