अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. याचे मुख्य कारण म्हणजे तिचं महाबळेश्वर येथील घर. मृण्मयी देशपांडे तिच्या नवऱ्याबरोबर महाबळेश्वरला स्थायिक झाली आहे. इतकंच नाही तर आता ती तिथे शेतीही करते.
शहरातलं घर सोडून मृण्मयी गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाच्या सानिध्यात राहत आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती याबद्दलचे अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. आतापर्यंत तिने सोशल मीडियावरून तिच्या घराची, आजूबाजूच्या परिसराची झलक दाखवली आहे. तर आता ती शेती करताना दिसली.
मृण्मयीने आज एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये तिने तिच्या बागेत उगवलेली कोथिंबीर आणि वांगी दाखवली. ही कोथिंबीर आणि वांगी तिने स्वतः एका बाऊलमध्ये काढून आणली. हा बाउल एका हातात आणि दुसऱ्या हातात छत्री घेऊन मृण्मयी फोटोमध्ये पोज देताना दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “फार्म टू टेबल”.
हेही वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…
मृण्मयीच्या या पोस्टवर तिचे चाहते कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया देत तिचा हा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. तिचा हा फोटो आता खूप चर्चेत आला आहे.