अभिनेत्री मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत ती अनेक नाटकं, मालिका, चित्रपट यामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारले आहेत. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या लुक्सबद्दल, तिच्या कामाबद्दल तिचे चाहते तिला नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. तर आता एका चाहत्याने तिला ‘तुमचे डोळे खूप थकलेले दिसत आहेत’, अशी प्रतिक्रिया दिली त्यावर मुक्ताने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या कामाबद्दल, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल तिच्या त्यांना वेळोवेळी अपडेट देत असते. सध्या तिचं ‘चारचौघी’ हे नाटक आणि ‘प्रिय भाई- एक कविता हवी आहे’ हा कार्यक्रम रंगभूमीवर सुरू आहे. या दोन्हीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आज ‘प्रिय भाई…’ या कार्यक्रमाच्या प्रयोगासाठी ती डोंबिवलीला जात असताना तिने इन्स्टाग्राम लाईव्हवरून चाहत्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा : Video: “बालगंधर्व नाट्यगृहात डास, अस्वच्छता, पण वाशीचं विष्णुदास भावे नाट्यगृहं…,” मुक्ता बर्वेने व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

इन्स्टाग्रामवर अचानक लाईव्ह येत तिने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. यावेळी चाहत्यांनी देखील त्यांच्या मनातले अनेक प्रश्न तिला विचारले. त्यावेळी काळजीपोटी एक चाहता तिला म्हणाला, “तुमचे डोळे खूप थकलेले दिसत आहेत.” त्यावर मुक्ताने देखील उत्तर दिलं. ती म्हणाली, “कारण प्रवास खूप चालला आहे ना सध्या. त्यामुळे डोळे दमलेले असणारच माझे. मेकअप नसेल तेव्हा ते असे खूप थकलेले दिसतात. पण मी छान आहे, मजेत आहे. माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. झोपेच्या वेळा बदलल्यामुळे डोळे कधीकधी थकलेले दिसतात.”

हेही वाचा : श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वेची केमिस्ट्री आली समोर…‘आपडी थापडी’चा टीझर प्रदर्शित

दरम्यान, मुक्ताच्या या उत्तराने सर्वच चाहत्यांचं लक्ष वेधलं. तर यानंतर अनेकांनी तिला त्यावर कमेंट करत काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा प्रेमाचा सल्ला दिला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mukta barve gave answer to fan and shared update about her health rnv