मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. गेली अनेक वर्षं ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आले आहेत. सर्व कलाकारांचं त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. सोशल मीडियावरून त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनीही त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली.

अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी आणि अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अनेकदा ते एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. तर काल रात्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”

हेही वाचा : Ashok Saraf birthday: ‘अशी’ झाली अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणण्याची सुरुवात, जाणून घ्या मजेशीर किस्सा

त्यांनी त्यांचा आणि अशोक सराफ यांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “हॅपी बर्थडे माय डार्लिंग… मी खूप भाग्यवान आहे की तू माझा जोडीदार आहेस. तू माझा मित्र आहेस, माझा मार्गदर्शक आहेस, तू सगळं काही आहेस. लव्ह यू.” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : “अशोक मामांसारख्या महानायकाबरोबर काम करणं म्हणजे…” रितेश देशमुखने सांगितला अनुभव

निवेदिता सराफ यांच्या या पोस्टवर अशोक व निवेदिता सराफ यांचे चाहते आणि त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स करत अशोकमामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader