महाराष्ट्राची कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘दगडीचाळ’ चित्रपटाचं नाव जरी घेतलं तरी “मन मन धागा जोडते नवा” हे पूजा व अंकुश यांच्यावर चित्रित झालेलं गाणं डोळ्यासमोर येतं. महाराष्ट्राची ही लाडकी अभिनेत्री काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली. पूजाने अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे लग्नानंतर पूजा महिनाभर परदेशात होती. नवरा बाहेरगावी कामाला असल्याने अभिनेत्री पुन्हा मनोरंजन विश्वात काम करणार की नाही? ती संसार आणि काम कसं सांभाळणार याबद्दल तिला बऱ्याच मुलाखतींमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. यावर, पूजाने “मी माझं काम सांभाळून ऑस्ट्रेलियात येऊन जाऊन राहणार” असं सांगितलं होतं. अगदी त्याप्रमाणे आता लग्नानंतर अभिनेत्रीचा पहिला प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पूजा ‘नाच गो बया’ या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेत्री लिहिते, “आमच्या नवीन गाण्याचा टीझर आलेला आहे, ‘नाच गो बया’ हे गाणं येत आहे येत्या ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता” या गाण्यात पूजाबरोबर आयुष संजीव, निक शिंदे, अक्षया नाईक, आकांक्षा गाडे आणि तश्वी भोईर हे कलाकार झळकणार आहेत.
पूजा सावंत प्रमुख भूमिकेत झळकणाऱ्या या ‘नाच गो बया’ गाण्याचं दिग्दर्शन प्रशांत नाकतीने केलं आहे. तर हे गाणं लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं जाणार आहे. सध्या सर्वत्र या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पूजा सावंत लग्नाआधी ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात पुष्कर जोग, दिशा परदेशी, पुष्कराज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यानंतर अभिनेत्री २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर अभिनेत्री ऑस्ट्रेलियाला गेली होती. यानंतर भारतात परतल्यावर पूजाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.