अभिनेत्री पूजा सावंत बुधवारी (२८ फेब्रुवारी रोजी) लग्नबंधनात अडकली. तिने शाही सोहळ्यात सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पूजाने साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर तिच्या लग्नाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती, अखेर बुधवारी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला. आता पूजाने तिच्या लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजाने लग्नात पिवळ्या रंगाची गुलाबी काठांची नऊवारी नेसली होती, नाकात नथ व सोन्याच्या दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी या खास दिवसासाठी निवडली होती.

पूजा व सिद्धेश दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते. पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांच्या शाही लग्नाची झलक पाहायला मिळत आहे.

पूजाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहते व सिनेसृष्टीतील पूजाचे मित्र-मैत्रिणी त्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती व सिद्धार्थ फेरे घेताना दिसत आहेत.

दरम्यान, बुधवारी सकाळी लग्न झाल्यानंतर संध्याकाळी पूजा व सिद्धेशने रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यांच्या रिसेप्शनला मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress pooja sawant siddhesh chavan wedding photos out bride and groom look viral hrc