‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. प्रेक्षकांबरोबरच कलाकारही या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरनेही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. प्राजक्ताला हा चित्रपट तर आवडलाच पण त्याचबरोबर सोहमचं कामही आवडलं.

आणखी वाचा : Video: सागवानी दरवाजा, प्रशस्त हॉल अन्…; ‘असं’ आहे प्राजक्ता गायकवाडचं नवीन आलिशान घर, पहिली झलक समोर

प्राजक्ताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती आणि ज्या महिलांबरोबर ती हा चित्रपट बघायला गेली होती त्या दिसत आहेत. हा सेल्फी शेअर करत तिने लिहिलं, ताई आणि रेड हार्ट दिले आणि रेड हार्ट दिले उत्कृष्ट चित्रपट. मोस्ट वॉच…” तर यानंतर सुचित्रा बांदेकर यांना टॅग करत तिने लिहिलं, ताई…” आणि लाल रंगाचे हार्ट इमोजी दिले. तर सोहम बांदेकरला यात टॅग करत तिने लिहिलं, “कमाल…”

हेही वाचा : … म्हणून प्राजक्ता गायकवाडने अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यातून घेतली एक्झिट, कारण आलं समोर

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सर्वत्र उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.