सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल भाष्य केले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे. तर या चित्रपटात सना शिंदे ही शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्राजक्ता माळीने हा चित्रपट पाहिला आहे. त्यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

Priya Bapat and umesh kamat celebrate 13th wedding anniversary
“हे खूप प्रेम, हसणं आणि…”, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…
Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview
नाट्यरंग : पाहिले न मी तुला – दृष्टिकोनातील…
marathi movie naad will release on october 25
Marathi Film ‘Naad’ Release Date : ‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला रूपेरी पडद्यावर
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
Snehal Tarde says I have not labeled myself as a director
“मी दिग्दर्शिकेचं लेबल स्वतःला लावून घेतलेलं नाही”, स्नेहल तरडेचं विधान, म्हणाली…
Marathi actors reaction on Union cabinet on approved granting classical language status to Marathi
“फक्त उत्सव नाही…”, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केल्यानंतर क्षितिज पटवर्धनसह मराठी कलाकारांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
Sankarshan Karhade Amruta Khanwilkar
“ती माझी रील फ्रेंड आहे”, अमृता खानविलकरबद्दल असं का म्हणाला संकर्षण कऱ्हाडे?
Krunal Ghorpade And Shreyas Sagvekar
“मी गाडीवर होतो…”, ‘तांबडी चामडी’ हे गाणं कसं तयार झालं? श्रेयस-क्रेटेक्सने सांगितला किस्सा…
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection
गांधी जयंतीला ‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत झाली वाढ, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

प्राजक्ता माळीची पोस्ट

“ठरल्याप्रमाणे मी “महाराष्ट्र दिन” ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट बघून साजरा केला…

मी चित्रपट पाहिला; तुम्ही पाहिलात का?
नसेल पाहिला तर आजच्या दिनी जुळून आलेला हा योग चुकवू नका.

अंकुश दादांच अप्रतिम काम, केदार सरांचं फार भारी दिग्दर्शन, सनाचा निरागसपणा, निर्मिती ताई- शुभागीचं रागावणं आणि अजय-अतूल दादांची गाणी… तुमचं मन जिंकून जातात…”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर प्राजक्ता माळीच्या भाचीने ठरला ठेका, म्हणाली “नाच येत नसेल…”

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.