अनेक मराठी कलाकार त्यांच्या कामबरोबरच सोशल मिडियावरील त्यांच्या रील्समुळेही चर्चेत असतात. क्रांती रेडकर, प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, कुशल बद्रिके असे अनेक कलाकार सोशल सक्रिय राहून मजेशीर रील्स पोस्ट करत असतात. आता स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहरे यांच्या एका रीलने लक्ष वेधलं आहे.
स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण आहेत. ‘मितवा’ या मालिकेतील त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. तर एकमेकांचा विषय निघाला की ते भरभरून बोलताना दिसतात. सोशल मिडियावरून ते एकमेकांच्या कामाचं कौतुकही करत असतात. तर आता मोठ्या कालावधीनंतर ते पुन्हा एकदा एका चित्रपटात दिसणार आहेत. या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते यूकेला गेले आहेत.
आणखी वाचा : सिद्धार्थ चांदेकरची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात, काय आहे पतीचं नाव? जाणून घ्या
या चित्रपटाच्या शूटिंगदारम्यान ते भरपूर मजा मस्ती करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी ‘कवाला’ या गाण्यावरचं त्यांचं एक रील शेअर केलं आहे. यात प्रार्थना आणि तिच्या मागे स्वप्नील उभा राहून या गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहेत. या गाण्यावर नसताना मागे उभे असलेल्या स्वप्नीलचा हात प्रार्थनाच्या डोक्याला जोरात लागतो. त्यावरती नाचायचं थांबते. पण त्यामुळे स्वप्निलला अजिबात हसू आवरत नाही. तो खळखळून हसतो पण त्याला खळखळून हसताना पाहून प्रार्थना त्याला मारू लागते आणि अखेर ती स्वप्नीलच्या पाठी लाथ मारते.
तर आता त्यांचं हे मजेशीर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.