प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रार्थनाने २००९ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. परंतु, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी प्रार्थना बेहरे एक टीव्ही रिपोर्टर होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रार्थनाने पत्रकारितेच्या कामाला सुरुवात केली होती. तिने अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. अभिनेत्रीने नुकतीच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला.
हेही वाचा : “नाटकाची बस जाळली अन्…”, शरद पोंक्षेनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा थरारक अनुभव
प्रार्थना म्हणाली, “मी तेव्हा स्टार न्यूजमध्ये काम करायचे. त्यामुळे स्टार रिपोर्टर म्हणून माझी ओळख निर्माण झाली होती. सगळीकडे वादग्रस्त प्रश्न विचारण्यासाठी मला पाठवलं जायचं कारण, मी सगळे प्रश्न अगदी बिनधास्त विचारायचे. संजय दत्त यांना मी असाच एक प्रश्न विचारला होता. सकाळी आमच्या सरांना संजय दत्त एका कॅन्सर रुग्णांशी संबंधित एका कार्यक्रमाला येणार आहेत असं कळालं. तेव्हा एका वृत्तपत्रात त्यांनी मान्यता दत्त यांचा टॅटू काढला आहे असं आलं होतं. त्यामुळे आमच्या सरांनी मला त्याठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी पाठवलं.”
हेही वाचा : “तीन अंकी नाटक इथेच संपलं”, गौतमी देशपांडेच्या आजोबांचं निधन; ‘या’ मालिकेत केलं होतं एकत्र काम
प्रार्थना पुढे म्हणाली, “कॅन्सर रुग्णांसंबंधित कार्यक्रम संपल्यावर संजय दत्त मागच्या गेटने बाहेर येत होते. त्यावेळी माझ्या हातातील बूम बघून ते थांबले. मी त्यांना प्रश्न विचारला ‘सर, आज सकाळच्या वृत्तपत्रात आलंय की, तुम्ही मान्यता दत्त यांचा टॅटू बनवला आहे.’ माझा प्रश्न ऐकून ते एवढे चिडले होते की, विचारू नका. मी फक्त मुलगी होते म्हणून वाचले नाहीतर त्यांनी मला मारलंच असतं…एवढे ते चिडले होते. पुढे, कॅमेऱ्यावर हात मारून ते निघून गेले. त्यानंतर मी माझ्या सरांना फोन करून सगळं काही सांगितलं. माझे सर मला म्हणाले, अरे ठिक आहे…आपल्यासाठी बातमी झाली त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही…त्यानंतर २ ते ३ दिवस ती बातमी सर्वत्र सुरु होती. संजय दत्त सरांच्या या घटनेनंतर पुढे सगळे वादग्रस्त प्रश्न विचारण्यासाठी मलाच पाठवलं जायचं.”
हेही वाचा : ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, प्रार्थना बेहेर २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.