प्रार्थना बेहरेचं नाव मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिने तिच्या प्रत्येक कामाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तर तिच्याबद्दल कधी कधी अफवाही ऐकायला मिळतात. तर आता अशीच स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा तिने सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रार्थना बेहेरेने नुकताच तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. तर सध्या प्रार्थना तिच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरून सर्वांच्या भेटीला येत आहे. या तिच्या चॅनलवर नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दलची अनेक गुपितं चाहत्यांशी शेअर केली.

आणखी वाचा : प्रशस्त हॉल, स्वतंत्र बार काउंटर अन्…; ‘असं’ आहे प्रार्थना बेहेरेचं अलिबागमधील अलिशान घर, पाहा खास झलक

प्रार्थनाने नुकताच तिच्या अलिबागच्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती सर्वांना तिचं अलिबागचं घर दाखवत तिच्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. “अशी कुठली अफवा आहे जी ऐकून तुला खूप हसायला आलं?” असा प्रश्न विचारण्यात आल्यावर प्रार्थना म्हणाली, “मध्यंतरी मी ऐकलं होतं किंवा कोणीतरी मला सांगितलं होतं की माझा नवरा मला मारतो. त्यावर मी आणि अभिषेक प्रचंड हसलो होतो. लोकांना त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून वाटत असेल की तो प्रार्थनाला मारतो पण हे सगळं खूप विनोदी आहे. तुम्हाला वाटतं की प्रार्थना बेहेरे कोणाच्या हातचा मार खाऊन घेईल?”

हेही वाचा : “आम्हाला मूल नकोय…,” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “आमच्या घरच्यांना…”

तर आता तिने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यावर कमेंट करत तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prarthana behere shares funny rumour about her married life rnv