प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांच्या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ या व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता प्रिया-उमेशची जोडी पुन्हा एकदा ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : OMG 2 Trailer : “मुलाचा व्हायरल व्हिडीओ, शिक्षण व्यवस्था अन्…”, अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’ चा ट्रेलर प्रदर्शित

नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये प्रिया-उमेशने काम केले आहे. परंतु, नाटकात तिसरी घंटा वाजल्यावर प्रयोगाआधी विशेष दडपण येते असा खुलासा प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. ‘मीडिया टॉल्क मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “नाटकाच्या प्रयोगाआधी पोटात गोळा येणे स्वभाविक आहे. आम्ही ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाचे एकूण ४४८ प्रयोग केले होते. तरीही अगदी शेवटच्या प्रयोगापर्यंत एन्ट्रीच्या आधी मनात एक धडधड जाणवायची.”

हेही वाचा : Video : “कोण म्हणतंय मुलीकडची बाजू पडकी…”, लग्नाला ६ महिने पूर्ण झाल्यावर वनिता खरातने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

प्रिया पुढे म्हणाली, “अनेक प्रयोग केल्यावर एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. पण, मनातील ती घालमेल, पोटात गोळा येणे कधीच कमी होत नाही. आता मी जवळपास १० वर्षांनी नाटक करत आहे त्यामुळे आता रंगीत तालीम करतानाही अरे बापरे! मला काहीच आठवलं नाहीतर काय होईल? असा विचार अनेकदा माझ्या मनात येतो.” तसेच प्रत्येक प्रयोगदरम्यान उमेश आणि माझे सहकलाकार मला खूप समजून घेतात असेही प्रियाने सांगितले.

हेही वाचा : “मराठी पाऊल पडते पुढे’चा सेट, रस्सीच्या मदतीने बनवलेला धनुष्यबाण अन्…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या नाटकाचा शुभारंभ ५ ऑगस्टला होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने उमेश-प्रिया यांची जोडी जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priya bapat shared her experience before drama show started sva 00