प्रिया बापट व उमेश कामत हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. आयडियल कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रिया-उमेश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

प्रियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन उमेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेण्डचा व्हिडीओ त्यांनी बनवला आहे. घरातच त्यांनी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया व उमेश दोघांनीही समोरासमोर उभे राहून डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा>>हार्दिक जोशीने शेअर केला अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ, म्हणाला…

प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये उमेशच्या डोक्यावर “मनात आलं की लगेच बोललंच पाहिजे असं नाही” असं लिहिलं आहे. तर प्रिया “एकदा मनात आलं की बोलून टाकायचं” असं म्हणत आहे. पती-पत्नीच्या नात्यातील जुगलबंदीच्या या व्हिडीओला प्रियाने “नवरा-बायकोतील संवाद” असं कॅप्शन दिलं आहे. प्रिया-उमेशच्या या मजेशीर व्हिडीओने चाहत्यांचंही लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>>Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

उमेश व प्रिया २०११मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघेही गेली अनेक वर्ष नाटक,मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेकदा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात.

Story img Loader