बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि सोशल मीडिया पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू राजगुरु सहभागी झाली आहे. आता नुकतंच त्यांच्या पात्राचं नाव समोर आलं आहे.
रिंकू राजगुरुने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यात रिंकू राजगुरु ही ड्रेस परिधान करुन पर्स घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. यावर ‘झिम्मा २’ असे लिहिले आहे.
आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
“सांगता येत नाही ते करायचंच कशाला??? सरळ पण प्रेमळ… झिम्मा २ ची नवी खेळाडू! सुनबाई… तानिया! ‘झिम्मा २’, २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…”, असे कॅप्शन रिंकू राजगुरुने दिले आहे.
‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू राजगुरुच्या पात्राचे नाव तानिया असे आहे. यात ती निर्मिती सांवत यांची सूनबाई असल्याचे पात्र साकारत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये तिची झलकही पाहायला मिळाली.
आणखी वाचा : “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहेत.