अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने ‘सैराट’मध्ये आर्चीची भूमिका साकारली आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पहिल्याच चित्रपटातून ती स्टार झाली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजही प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून की नेहमीच्या संपर्कात असते. नुकत्याच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या. आता नेमकं काय घडलं आहे त्याचा खुलासा रिंकूने केला आहे.
इन्स्टाग्रामवर तिचे ७ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. रिंकू तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, तिचे आगामी प्रोजेक्ट याबद्दलची माहिती चाहत्यांची शेअर करत असते. पण दोन-तीन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवरून सगळ्या पोस्ट अचानक गायब झाल्या. तिचे सगळे फोटो डिलीट झाल्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्या. तिने पोस्ट का डिलीट केल्या? तिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं का? असे विविध प्रश्न नेटकऱ्यांना पडले होते. तर आता रिंकूनेच याचं उत्तर दिलं आहे.
नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. त्यात तुम्ही लिहिलं, “नमस्कार. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. पण आता सगळं ठीक आहे आणि मी लवकरच पोस्ट टाकण्यास सुरुवात करेन. तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद.” तर आता रिंकूच्या या स्टोरीमुळे रिंकूने तिच्या सगळ्या पोस्ट का डिलीट केल्या या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.