मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तर आता लवकरच ती ‘अंकुश’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता गौरव मोरेबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता आणि त्यांच्यातलं बॉण्डिंग कसं आहे हे तिने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “घर घेतल्यावर आता त्याचा EMI…,” ऋतुजा बागवेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

काही दिवसांपूर्वीच ‘अंकुश’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तर या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबरच या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आहे. यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. तर चित्रपटात त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आता ऋतुजाने सांगितला आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये फटकारलं, टोमणे खावे लागले…” विशाखा सुभेदार यांनी सांगितलं कार्यक्रम सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या, “स्किट झाल्यानंतर…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “गौरवबरोबर काम करण्याचा अनुभव खूप कमाल होता. मी त्याला गेली अनेक वर्ष ओळखत आहे त्याच्याबरोबर काम करण्याची संधी आत्ता मला मिळाली. पुढच्या महिन्यात माझा आणखी एक चित्रपट येणार आहे आणि त्यातही गौरव आहे. यात तो माझ्या भावाच्या खास मित्राची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो अत्यंत खट्याळ आणि खोडकर दाखवला आहे. त्यामुळे मला असं वाटत असतं की हा माझ्या भावाला बिघडवतोय त्यामुळे मी सारखी मीतयाचयावर चिडत असते, असं आमचं बॉण्डिंग प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल.”