Sai Tamhankar on Feminism: सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःच भक्कम स्थान निर्माण केलं आहे. सई आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेक विषयांवर ती आपली मतं ठामपण मांडते. सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. यात तिने फेमिनिझम, लैंगिक सुख व सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकरला सेक्स एज्युकेशन कुठून मिळालं, लैंगिक सुखाबद्दल बोलायची क्षमता कुठून आली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सई म्हणाली, “घरातून. मी लहान असतानाच मला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल शिकवण्यात आलं होतं. मला हेही शिकवलं होतं की कोणी ओळखीतले आहेत तर ते असं वागणार नाहीत असे कोणतेही निकष नाहीत. हा चांगला स्पर्श आहे व हा वाईट स्पर्श आहे हेच मला शिकवलं होतं.”

“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

पुढे सई म्हणाली, “माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केला, त्यामुळे कदाचित या गोष्टी शिकवल्या असतील. ती एक कणखर आई आहे.” घराशिवाय शाळेत सेक्स एज्युकेशन दिले जायचे. हे दोन स्रोत होते, जे महत्त्वाचे होते, असंही सईने नमूद केलं.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

अभिनेत्री सई ताम्हणकर (फोटो – इन्स्टाग्राम)

सई म्हणाली, “मला वाटतं की आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते. खरं तर तो नात्याचा खूप महत्वाचा भाग आहे, असं मला वाटतं. जेव्हा दोन जण एका नात्यात असतात तेव्हा या गोष्टीकडे ते लक्षच देत नाहीत, असं मी खूपदा ऐकलं आहे. नात्यात सेक्स सर्वात शेवटी येतो. नातं ऑटो पायलट मोडवर चाललंय व सेक्स सर्वात मागच्या सीटवर असतं. यावर चर्चा करण्यासाठी दोघेही जोडीदार इच्छुक व पॅशनेट असणं गरजेचं आहे.”

“मीच घर चालवते त्यामुळे…”, सई ताम्हणकरने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव; आईबद्दल म्हणाली….

फेमनिझमबद्दल काय म्हणाली सई ताम्हणकर?

Sai Tamhankar on Feminism : यानंतर तुझ्यासाठी फेमनिझम काय आहे, असा प्रश्न विचारल्यावर सई म्हणाली, “मला या प्रश्नाचीच अडचण आहे. आपण समान आहोत हे अजूनही समजावून का सांगावं लागतंय. ही वेळ केव्हा आली की गोष्टी मागाव्या लागत आहेत. अमूक लिंग असलेली व्यक्ती मजबूत आहे व अमूक लिंग असलेली व्यक्ती कमजोर आहे हे कोणी ठरवलं? मला वाटतं की स्त्री व पुरुष दोघांकडेही काही असे गुण आहेत जे एकमेकांकडे नाहीत. दोघेही एकत्र आल्यावर एक सुंदर टीम तयार होते. मी दोन्हीकडे सारख्याच नजरेने पाहते. त्यामुळे भेदभाव न करता दोन्हीकडे समानतेने पाहणे व समानतेने जगणे हेच खरे फेमिनिझम आहे.”