अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचं नाव मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता तिने तिच्या आयुष्यातील एका अनुभवाबद्दल मोठा खुलासा केला आहे. एकदा तिला तिच्या आईने झाडूने मारलं होतं असं तिने सांगितलं आहे.

संस्कृतीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय याचे अपडेट्स ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून देत असते. याचबरोबर अनेक मुलाखतींमधून ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांना सांगत असते. आता ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा शालेय वयातील एक किस्सा शेअर केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : “मला वाटलं ॲसिड अटॅक होणार…,” संस्कृती बालगुडेने सांगितला चाहत्याचा विचित्र अनुभव, म्हणाली, “तो घरी आला आणि…”

“पहिली शिवी कधी दिलीस?” असं विचारल्यावर ती मिळाली, “मी पहिली शिवी आईसमोर गेली होती. ती आईला नक्कीच दिली नव्हती कारण ते शक्यच नाही…तेवढी हिंमतही नाही. पण मी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शिवी दिली होती आणि तेव्हा आई नेमकी समोर बसली होती. तिने ते ऐकलं.”

हेही वाचा : अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

पुढे ती म्हणाली, “तो शब्द ऐकल्यावर तिने एक मोठा पॉज घेतला. तिने मला विचारलं काय म्हणालीस तू? परत बोल. तेव्हा माझ्या तोंडून तो शब्दच फुटेना. आईने बाजूला असलेला झाडू घेतला आणि मला बेदम मारलं. मला अजून आठवतंय आमच्या बेडवर मी इकडून तिकडे पळत होते आणि आई झाडूने मला मारत होती.”

Story img Loader