मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये सायली संजीवचं नाव वरच्या स्थानी घेतलं जातं. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या सायलीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते. अनेकदा तिच्याबद्दल विविध अफवा पसरत असतात. आता याबद्दल तिने तिचं मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली संजीव हिने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली. ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ ही या कार्यक्रमाची यावर्षीची टॅगलाईन आहे. याच निमित्ताने तिने ‘सेलिब्रिटी कट्टा’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिच्याबद्दल रंगणाऱ्या अफवा आणि तिला केलं जाणार ट्रोल याकडे ती कसं बघते हे सांगितलं.

आणखी वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

सायली म्हणाली, “माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा मला कधीही त्रास होत नाही. एक दोन वेळा झाला असेल थोडा पण ठीक आहे. आपण त्यांना अफवा म्हणतो म्हणजेच ती खोटी गोष्ट आहे. त्यामुळे कधी ना कधी खरी गोष्ट लोकांसमोर येईलच. त्यामुळे कशाला त्याबद्दल एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा!”

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

काही महिन्यांपूर्वी सायली संजीव हिचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी जोडलं गेलं होतं. त्या सर्व चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट करत सायलीने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sayali sanjeev talked about rumours about her and how does she handle that rnv