बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडीओची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असणार आहे. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता चित्रपटात आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री सायली संजीव चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांची भूमिका सायली साकारणार आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले आहे. यानिमित्ताने सायली पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा >> Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘रिक्षावाली’ने लावला बोल्डनेसचा तडका; बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरली अन्…

हेही वाचा >> शाहरुख खानच्या ‘पठाण’चा सिक्वेल येणार?, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रंगली चर्चा

‘हर हर महादेव’ चित्रपटातील महाराणी सईबाईंच्या लूकमधील पोस्टर शेअर करत सायलीने “मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले”, असं म्हटलं आहे.

हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

सुबोध भावे आणि सायलीसह अभिनेता शरद केळकर, अमृता खानविलकरही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. शरद केळकर शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. तर अमृता खानविलकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sayali sanjeev to play maharani saibai bhosale role in subodh bhave har har mahadev movie kak