‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. उद्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या ‘डिजिटल अड्ड्या’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी तरुणींना मोलाचा सल्ला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी ते सर्वजण चित्रपटाबद्दल भरभरून बोलले. याचबरोबर त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से, खऱ्या आयुष्यात त्यांना आलेले अनुभव अशा विविध मुद्द्यांवर दिलखुलासपणे संवाद साधला.

आणखी वाचा : “ती किती कुसक्यासारखी माझ्याशी वागते…,” केदार शिंदेंनी शिल्पा नवलकरसाठी केलेली पोस्ट चर्चेत

“करिअर करताना आपल्या आई-वडिल आणि नवऱ्याबरोबरच सासू-सासर्‍यांचाही पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं असतं. लग्नानंतर सर्वांशी गोड बोलून, थोडं ॲडजस्ट करून, करिअर महत्त्वाचं असतंच पण त्याचबरोबर आपल्या घरातील जबाबदाऱ्या ओळखून मुली सासरी वावरल्या तर अनेक गोष्टी सोप्या होतील. हे करत असताना तुम्ही तुमच्या सासूलाही खुश ठेवा. तुम्हाला ते जमलं तर त्यांच्याकडूनही तुम्हाला तसाच सकारात्मक प्रतिसाद मिळेल,” असं या सर्वजणी म्हणाल्या.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून लोकप्रिय मराठी स्टारकिड करणार मनोरंजनसृष्टीत पदार्पण, तुम्ही तिला ओळखलं का?

तर यानंतर अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी मोलाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, “त्यामुळे लग्न करताना तुम्ही आधी सासू बघून घ्या. सासू चांगली मिळाली की तुमचं करिअर, तुमचं पुढचं आयुष्य या सगळ्या गोष्टी सोप्या होतात.” आता शिल्पा नवलकर यांचं हे बोलणं चर्चेत आलं आहे. दरम्यान, या सर्वांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट उद्या म्हणजेच ३० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.