‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरताना दिसत आहेत. या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. स्त्रियांवर आधारित या चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकरने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडीबरोबर काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ने १७ दिवसांत ओलांडला ५० कोटींचा टप्पा, एकूण कलेक्शन तब्बल…

एका मुलाखतीत शिल्पा म्हणाली, “मला रोहिणी ताईबरोबर काम करताना एक वेगळं बॉन्डिंग तयार झाल्यासारखं वाटलं. मला या बाईची कमाल वाटते. ज्या बाईने ‘गांधी’सारखा चित्रपट केला आहे. त्या दर्जाच्या भूमिका केल्या आहेत त्यांनी. पण जेव्हा त्या सेटवर असतात तेव्हा त्या तुमची मावशी, तुमची आजी, तुमची आत्या जसं तुमच्याशी घरात वागतात तशाच त्या सेटवर आमच्याशी वागत होत्या. रोहिणी हट्टंगडीसारखी बाई असं वागू शकते हे माझं आश्चर्य आत्तापर्यंत संपलं नाही.”

हेही वाचा- “उगाचच कुणाच्यातरी पदरी…”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर दिग्दर्शक विजू मानेंचे वक्तव्य

या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातील रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

हेही वाचा- “चित्रपट पाहिल्यावर पहिला फोन अंकुश चौधरीचा आला अन्…”, ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे. अवघ्या पाच कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress shilpa navalkar share work experience with rohini hattangadi in baipan bhari deva dpj
Show comments