Shubhangi Gokhale: शुभांगी गोखले या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शुभांगी गोखले यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी अभिनयविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शुभांगी सोशल मीडियावर सक्रिय आहेत, त्यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

शुभांगी गोखले यांना त्यांची मुलगी सखी गोखले जोशी हिने एक भेटवस्तू दिली आहे. या भेटवस्तूचा फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. सखीने नॉइज कॅन्सलेशन इअरप्लग्ज गिफ्ट केले आहेत. “थँक्यू सखी! पुढच्या १० दिवसांसाठी परफेक्ट गिफ्ट. नॉइज कॅन्सलेशनसाठी इअरप्लग्ज. मोरया,” असं कॅप्शन शुभांगी यांनी या पोस्टला दिलं आहे. त्यांनी त्यांच्या गिफ्टचे दोन फोटो शेअर केले आहेत.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल

Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरमुळे चाहत्याचं झालं नुकसान, म्हणाला, “तुमच्यामुळे बायकोने…”

Shubhangi Gokhale post
शुभांगी गोखले यांची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

शुभांगी गोखले यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत गणेशोत्सवाबद्दल त्यांचं मत मांडलं होतं. त्यानंतर आता त्यांनी केलेली ही पोस्ट याची चांगलीच चर्चा आहे.

काय म्हणाल्या होत्या शुभांगी गोखले?

शुभांगी गोखले या नुकत्याच ‘घरत गणपती’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल त्यांचं मत मांडलं होतं. “मी मूळची मराठवाड्याची असल्याने गणेशोत्सवाच्या माझ्या अशा फारशा आठवणी नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो आणि मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे,” असं शुभांगी गोखले म्हणाल्या होत्या.

“सार्वजनिक गणपती करू नये”, शुभांगी गोखलेंचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “दारू पिऊन पत्ते खेळणं…”

यावेळी त्यांनी गणेशोत्सवात चुकीच्या गोष्टी घडतात, असंही म्हटलं होतं. “मी गणेशोत्सवात पुण्यातल्या पाच गणपतींचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर मी मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला आहे. पण, सार्वजनिक गणपतीबद्दल सांगायचं झालं तर, गणेशोत्सवाचं जे काही अवडंबर झालं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. याशिवाय अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो पण, मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता… पण, त्यानंतर रात्री तुम्ही दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं आणि हे कोणीच अमान्य करू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे… हे अजिबातच चांगलं नाहीये,” असं परखड मत त्यांनी मांडलं होतं.

शाहरुख खानच्या घरच्या बाप्पाला पाहिलंत का? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिल्या चाहत्यांना शुभेच्छा; म्हणाला, “आपल्या सर्वांना…”

“या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमच्याच देवाचा अपमान करता. त्यामुळे आता हे बंद केलं पाहिजे. छोट्या- छोट्या गावांमध्ये आता सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत. कारण, सार्वजनिक गणेशोत्सवात प्रदूषण होतं…एनर्जी वाया जाते. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो,” असं शुभांगी गोखले म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर काही गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती.

Story img Loader