मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीही कायमच चर्चेत असतात. नुकतंच सोनालीने फुलवाबरोबर मिळून आमरस पुरीचा बेत केला आहे. यामागचे विशेष कारण असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने “प्रथेप्रमाणे… आमरसपुरी” असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “आम्हा दोघांना…” अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर सुयश टिळकची पहिली प्रतिक्रिया
या व्हिडीओत सोनाली आणि फुलवा या आमरस करताना दिसत आहे. तेव्हा फुलवा म्हणते, “आमच्याकडे दरवर्षी अशी प्रथा आहे की सोनाली ही माझ्या घरी पहिला आंबा… आंबा नाही तर पहिली आमरस पुरी हे सोनाली माझ्याकडे खाते.”
त्यानंतर सोनाली म्हणते की, “मी पहिल्यांदा आमरस बनवायला मदत करतेय.” “कारण इतर वेळी ती फक्त आमरस खाते. पण आता तिला मी आमरस बनवण्यात मदत करते. यावेळी मी आंबेही घेऊन आले आणि त्याच्या बदल्यात मी तिला आंबे देणारही आहे”, असे यावेळी फुलवाने म्हटले.
“तिने ते आंबे फ्रीजमध्ये ठेवले होते. कारण फ्रीजमध्ये आंबे ठेवले तर त्याची चव जाते. त्यामुळे यातील काही आंब्यांची चव गेली आहे, त्यामुळे आम्ही फुलवा ताईचे आंबे आणि माझे आंबे अशा दोन्हींचा रस एकत्र करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला चव कळणार नाही”, असे सोनालीने म्हटले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
दरम्यान सोनाली आणि फुलवाच्या या व्हिडीओवर सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुलने कमेंट केली आहे. “थोडासा पॅक करुनही घेऊन ये”, अशी कमेंट त्याने केली आहे. त्यावर फुलवाने “तू कधीही घरी येऊ शकतो, हे तुला माहितीये”, असे उत्तर त्याला दिले आहे.