महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोड, बाबूराव अत्राम, अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. सध्याच्या या राजकीय घडामोडीवर मनोरंजनसृष्टीतील कलाकार व्यक्त होत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचीही यासंदर्भातली इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील राजकीय घडामोडीविषयी सोनालीनं चाहत्यांचं प्रश्न विचारला आहे. “पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?” असं प्रश्न विचारत सोनालीनं रिअॅक्ट बारमध्ये ‘मजाक’ लिहित ही स्टोरी शेअर केली आहे. सोनालीची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर शरद पोंक्षेंनी मांडले परखड मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “शब्द आज वारले”

हेही वाचा – “मतदारांची ऐशी तैशी”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाची राजकीय भूकंपावर पोस्ट; म्हणाले, “सर्व काँग्रेसी नेते…”

सोनाली व्यतिरिक्त अनेक मराठी कलाकारांनी आज घडलेल्या राजकीय घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. “भेळ हवीये भेळ? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल,” असं ट्वीट अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलं आहे. तसेच तिनं “आता महाराष्ट्रावर तत्वनिष्ट, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं ‘राज’ करावं – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक” असं लिहित तेजस्विनीनं आपलं परखडं मत मांडलं आहे.

हेही वाचा – “उत्तम पटकथा लिहिण्याची…”, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर स्वप्नील जोशीचे ‘ते’ ट्वीट व्हायरल

दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यातल्या राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नेतेमंडळींच्या गाड्या राजभवनाच्या दिशेने जाता पाहायला मिळतं होत्या. अखेर आज दुपारी राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. आणि राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sonalee kulkarni share post about maharashtra politics pps
Show comments