गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी सुद्धा गणपतीची लगबग सुरु झाली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तुम्ही सगळे महान आहात”, हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी प्रसिद्ध गायिकेची खास पोस्ट; म्हणाली, “मी फोनवर…”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेली अनेक वर्ष आपल्या भावासह बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती घडवते. यंदाही तिने बाप्पाचं खास रुप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाचं आगमन आता दोन दिवसांवर आल्याने सोनालीच्या घरी सजावटीची तयारी सुरु करण्यात आली आहे. अभिनेत्रीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा सुंदर व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. सोनालीने मूर्ती घडवण्यासाठी देहूगावची माती आणि घरातील तुळस याचा वापर केला होता.

हेही वाचा : “Happy Birthday बायको”, शशांक केतकरची पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणाला, “तू असल्याने जगण्याला…”

सोनाली या व्हिडीओमध्ये म्हणते, “गेल्या पाच वर्षांपासून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं मिळून आमचा बाप्पा बनवतो. यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी खूप भावनिक आहे कारण, माझी आजी यंदा माझ्याबरोबर नाही. गेल्यावर्षी आजी आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलो नव्हतो. एवढी वर्ष मी आणि माझा भाऊ मूर्ती बनवत असताना आजी दारावर उभी राहून आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची. हा गणेशोत्सव आम्ही पहिल्यांदाच तिच्याशिवाय साजरा करत आहोत. परंतु, तिची आठवण कायम आमच्याबरोबर असेल.”

हेही वाचा : “स्मशानात लागणारी लाकडं मी…”, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

“आमचे आजी-आजोबा देहूगावला राहायचे, त्यामुळे देहूगावचे आमच्यावर अनेक संस्कार आहेत. त्यामुळे यंदा आम्ही देहूगाव आणि आजी-आजोबा यांच्याशी जवळचं नातं असलेली मूर्ती साकारली. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या रुपात आम्ही बाप्पा साकारण्याचा प्रयत्न केला आहे.” असं सोनालीने या व्हिडीओमध्ये सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sonalee kulkarni shared ganpati bappa idol making video sva 00