अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे या मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सामील आहेत. त्या दोघी एकमेकांच्या खूप घट्ट मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या एकत्र मजा मस्ती करताना दिसतात. तर आता सोनालीने प्रार्थनाबद्दलचा एक प्रश्न चाहत्यांना विचारला. त्यावर एकाने दिलेल्या उत्तराने दोघीही थक्क झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रार्थना आणि सोनाली नुकत्याच मुंबईच्या बाहेर एका शांत ठिकाणी फिरायला गेल्या होत्या. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. एकमेकींबरोबर भरपूर गप्पा मारण्यासाठी आणि एकत्र वर्कआउट करण्यासाठी त्या तिथे गेल्या. तिथे त्यांनी खूप मजा मस्ती केली. तर यादरम्यान सोनालीने चाहत्यांना प्रार्थनाच्या मनातलं ओळखायला सांगितलं.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

सोनाली आणि प्रार्थना एकत्र असताना सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना “प्रार्थना आत्ता काय विचार करत असेल?” असा प्रश्न विचारला. त्यावर चाहत्यांनी विविध उत्तरं दिली. तर एक चाहता उत्तर देत म्हणाला “सेक्स.” त्याचं हे उत्तर वाचून दोघीही आश्चर्यचकित झाल्या. सोनालीने चाहत्याचं हे उत्तर पोस्ट करत त्या दोघींचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. यामध्ये दोघीही आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा : “आम्ही जिथे जातो तिथे…”; दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून टोमणे मारणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

तर त्या फोटोमध्ये प्रार्थना तिच्या तोंडावर बोट ठेवून चाहत्याला गप्प बसण्याची खूण करताना दिसत आहे. सोनालीने पोस्ट केलेली ही स्टोरी आता चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sonali kulkarni and prarthana behere plays a quiz with fans and get shocked by fans reply rnv