सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. तर आता अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी या चित्रपटातील भूमिकेशी त्या किती रिलेट करतात याचं अगदी मजेशीर उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी या चित्रपटात अगदी वेगळी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्यांचा लूकही अगदी हटके आहे. या चित्रपटात त्यांच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं दाखवलं आहे. तर या चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील नवऱ्याबद्दल त्या काय निर्णय घेतात हेही प्रेक्षकांना पाहायला मिळतं.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”

आणखी वाचा : “आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत कारण…”, सुचित्रा बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत

‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत या भूमिकेशी त्या किती रिलेट करू शकल्या हे त्यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “तिची भूमिका बघून मी रिलेट करू शकले पण तिची गोष्ट मी माझ्या आयुष्याशी रिलेट करू शकले नाही. कारण आदेश खूप चांगला आहे. तो लफडी वगैरे करत नाही किंवा त्या वाट्याला कधी जातही नाही. नाहीतर चित्रपटातील पल्लवी जशी रिॲक्ट झाली आहे त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन हे आदेशला माहीत आहे.” सुचित्रा बांदेकर यांनी दिलेलं हे मजेशीर उत्तर खूप चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : …अन् आदेश भावोजींनी काढला होता सुचित्राच्या वडिलांसमोरून पळ, ‘अशी’ आहे दोघांची हटके लव्हस्टोरी

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपटगृहात खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली. आता दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

Story img Loader