अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. मराठी बरोबरच त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्या नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसतात. आता त्यांच्या कामाच्या निवडीबाबत त्यांच्या घरच्यांचा त्यांना कसा पाठिंबा मिळतो हे त्यांनी सांगितलं आहे.

सुचित्रा बांदेकर यांनी आत्तापर्यंत मराठी मालिका, चित्रपट, याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी मोजके चित्रपट केले पण ते सगळे प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडले. तर आता त्या काय विचार करून भूमिका निवडतात आणि यामध्ये घरच्यांचं काय मत असतं याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर मी…”, सुचित्रा बांदेकरांचं उत्तर चर्चेत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला माझ्या कामाच्या निवडीबाबत माझ्या कुटुंबीयांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. मी काय काम करायचं, कोणती भूमिका करायची याबद्दलचे निर्णय पूर्णपणे माझे असतात. पण त्या बाबतीत मी थोडी हट्टी आहे. एकतर मैत्रीखातर मी त्या भूमिकेला होकार देते किंवा त्या भूमिकेची ताकद पाहून भूमिका स्वीकारते. गेल्या काही वर्षांमध्ये मी मालिकेत काम केलं नाहीये त्यामुळे छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला मला नक्कीच आवडेल. पण भूमिका चांगली असायला हवी याबाबत मी आग्रही आहे. रोज सकाळी साडेआठची शिफ्ट करण्याची ऊर्जा देणारी ती भूमिका असेल तर नक्कीच विचार करेन. तर नाटकात काम करायचा माझा अजून विचार नाही. मी साकारलेली भूमिका इतरांसाठी ड्रीम रोल ठरवी यासाठी मी नेहमी प्रयत्न करते.”

आणखी वाचा : “तो फक्त माझा मुलगा आहे म्हणून नाही तर…”, लेकाच्या कामाबद्दल सुचित्रा बांदेकरांनी केलं स्पष्ट भाष्य, म्हणाल्या…

दरम्यान, सुचित्रा बांदेकर नुकत्याच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. हा चित्रपटही चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ७० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.