‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान एका मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी हा चित्रपट सुपरहिट होण्यामागचं कारण सांगितलं आहे.

हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सासूची प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांना हा चित्रपट…”

Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
celebrity masterchef highest earning contestant tejasswi nikki tamboli usha Nadkarni
‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी तेजस्वी प्रकाश घेते सर्वाधिक मानधन; तर निक्की तांबोळी, उषा नाडकर्णींना मिळतात ‘इतके’ पैसे
Shiva
Video : “तुला काहीतरी सांगायचंय…”, शिवाचा विश्वास खरा ठरणार, आशू त्याचे प्रेम व्यक्त करणार; पाहा नेमकं काय घडणार

सुचित्रा म्हणाल्या “मला खूप जण म्हणाले की मी ज्या चित्रपटात असते तो चित्रपट सुपरहिट होतो. मी सुरुवातीला म्हणायचे की असं काही नाहीये. पण आता भाव खायला म्हणते मी की मी ज्या चित्रपटात असते तो चित्रपट सुपरहिट होतो. पण असं काही नसतं हेसुद्ध मला माहिती आहे.”

केवळ ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवला होता. आत्तापर्यंत या चित्रपटाने ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा-“मला या बाईची…”; ‘बाई पण भारी देवा’तील अभिनेत्रीने सांगितला रोहिणी हट्टंगडीबाबतचा किस्सा, म्हणाली…

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. स्त्रियांवर आधारित असणाऱ्या य़ा चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक करण्यात येत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे. अवघ्या पाच कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

Story img Loader