‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या यशानंतर अलीकडेच संपूर्ण टीमने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी “बाईपण भारी देवा” चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच या पार्टीत चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से आणि आठवणी कलाकारांनी सांगितल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘जय शिवराय’ म्हणत सह्याद्रीच्या धबधब्यावर आकाश ठोसरने केलं थरारक रॅपलिंग, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “सेफ्टीबद्दल…”

‘बाईपण भारी देवा’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुकन्या मोनेंना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राजस्थानमधून एका बाईचा ई-मेल आला होता. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, “राजस्थान कोटा येथून मला एका बाईचा ई-मेल आला होता. त्या पेशाने वकील होत्या. त्यांनी भांडण करून राजस्थानमध्ये चित्रपटाचा शो ठेवला होता. त्यांच्याकडे अजिबात मराठी चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जात नाही. पहिल्यांदाच त्या बाईंच्या विनंतीला मान देऊन “बाईपण…”चा शो तेथे लावण्यात आला होता. त्या एकूण १५० बायकांनी अक्षरश: भांडण करून स्पेशल शोची मागणी केली होती.”

हेही वाचा : “सहसा मी रडत नाही, पण…”, सुधा मूर्तींनी सांगितला किस्सा; म्हणाल्या, “आलिया भट्टचा अभिनय पाहून…”

सुकन्या मोने पुढे म्हणाल्या, “त्या बाईंची एकच मागणी होती की, आम्ही १५० बायका चित्रपट पाहायला जात आहोत आणि आमच्याकडे तुमचे पोस्टर नाही. पोस्टर काही करून पाठवा कारण, आम्हाला फोटो काढायचे आहेत. आमच्या मार्केटिंग टीमने त्या बायकांसाठी पोस्टरची व्यवस्था केली आणि त्यांनी पोस्टरजवळ उभं राहून फोटो काढले, व्हिडीओ केले ते सगळे आम्हाला पाठवले. ही, आमच्या पोस्टरची कमाल आहे.”

हेही वाचा : “बार्बी भारतीय असती तर?”, बायको मिताली मयेकरच्या व्हिडीओवर सिद्धार्थ चांदेकरने केली खास कमेंट; म्हणाला, “लगीन करायचंय…”

दुसरा किस्सा सांगताना सुकन्या मोने म्हणाल्या, “आम्ही सगळेजण पुण्यातील एका चित्रपटगृहात गेलो होतो. तेथील क्लार्कने मला सांगितलं हैराण केलंय बायकांनी…आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाच्या पोस्टरजवळ उभं राहून एवढे फोटो कोणीही काढले नव्हते. आतापर्यंत जवळपास १५ हजार बायकांनी या पोस्टरबरोबर फोटो काढलेत.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sukanya kulkarni mone shared incidence regarding baipan bhari deva movie poster which happened in rajasthan sva 00