गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट तयार झाले. त्यातील अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर आता लवकरच दिवंगत गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सुधीर फडके यांच्या बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटामध्ये सुधीर फडके यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटामध्ये दिवंगत गायिका माणिक वर्मा यांची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’मुळे सावनी रविंद्रला येऊ लागल्या मंगळागौरीच्या ऑफर्स, मजेशीर किस्सा शेअर करत म्हणाली, “सकाळी ८ वाजता…”

या चित्रपटामध्ये माणिक वर्मा यांच्या भूमिकेत अभिजीत खांडेकरची पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकर दिसणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही बातमी चाहत्यांना सांगितली. या चित्रपटाच्या घोषणेच्या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “तब्बल ५० वर्षं मराठी चित्रपटसृष्टीवर ज्यांनी राज्य केलं अश्या स्व. सुधीर फडके अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके ‘बाबुजी’ ह्यांच्या आयुष्यावर येऊ घातलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या योगेश देशपांडे लिखित, दिग्दर्शित चित्रपटाची काल घोषणा झाली. या चित्रपटात स्व.माणिक वर्मा ह्यांची भूमिका मला साकारायची संधी मिळतेय. चित्रिकरण लवकरच सुरू होईल. लोभ असावा.”

हेही वाचा : अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांचा नवीन घरातील गृह प्रवेशाचे फोटो पाहिलेत का?

आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिथे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी तिचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा देत आहेत. या चित्रपटात सुधीर फडके यांच्या भूमिकेत अभिनेता सुनील बर्वे दिसणार आहेत. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होईल. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader