Sulochana Latkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाक्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर ट्वीट करत दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकथान शिंदे यांनीही ट्वीट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे”.

आणखी वाचा – चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन

“परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दीदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबरीने अनेक राजकीय मंडळींनीही ट्विटरद्वारे सुलोचना दीदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – “अनेकांच्या मनातील वात्सल्यमूर्ती हरपली”; सुलोचना दीदींच्या निधानानंतर राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sulochana latkar passed away at the age of 94 cm eknath shinde tweet see details kmd