मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजवर अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता तेजस्विनी ‘बांबू’ या तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.
तेजस्विनी सध्या ‘बांबू’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता तिने ‘एबीपी माझा’च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर हजेरी लावली. इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे तेजस्विनीने प्रेक्षकांशी संवाद साधत दिलखुलासपणे मुलाखतीतील प्रश्नांना उत्तरं दिली. या मुलाखतीत तेजस्विनीने तिच्या कॉलेज जीवनातील एक मजेशीर किस्साही सांगितला.
हेही वाचा>> “’वेड’ या सिनेमाने…”, रितेश देशमुखच्या चित्रपटाबाबत तेजस्विनी पंडितचं मोठं विधान
हेही पाहा>> …अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो
तेजस्विनी म्हणाली, “कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. आमच्या मुलींच्या ग्रुपमध्ये हिंमत असलेली मी एकमेव होते. माझ्या बेस्ट फ्रेंडला एक मुलगा आवडायचा. पण त्याला प्रपोज करण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिच्यातर्फे मी त्या मुलाला प्रपोज करावं, असं तिला वाटतं होतं. मी त्या मुलाजवळ गेले आणि माझ्या मैत्रिणीला तू आवडतोस, असं त्याला सांगितलं. त्यावर त्या मुलाने उत्तर न देता उलट मलाच प्रपोज केलं. मला ती नाही, तू आवडतेस असं तो म्हणाला”.
हेही वाचा>> Bigg Boss 16: “मेरी जान, मेरा दिल”, अब्दू रोझिक घराबाहेर पडताच ढसाढसा रडला शिव ठाकरे, व्हिडीओ व्हायरल
तेजस्विनीची निर्मिती असलेला ‘बांबू’ हा चित्रपट येत्या २६ जानेवाराला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर समीर चौगुले, स्नेहल शिदम, शिवाजी साटम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.