ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या गेली अनेक वर्षं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मनोरंजनसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्या नेहमीच त्यांना आलेले अनुभव, काही मजेदार किस्से चाहत्यांशी शेअर करत असतात. तर आता त्यांनी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याबरोबर त्यांचं नातं कसं आहे हे उलगडलं आहे.

वंदना गुप्ते यांचे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याशी खूप जुने संबंध आहेत. गेली अनेक वर्षं ते एकमेकांना ओळखतात. दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरं आहेत, त्यामुळे अनेकदा त्यांचं भेटणं होत असतं. तर राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नापूर्वी वंदना गुप्ते त्यांची प्रेमपत्रं एकमेकांपर्यंत पोहोचवायच्या, असा खुलासा त्यांनी केला आहे.

tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Uddhav Raj Thackeray meet at family function Mumbai news
उद्धव- राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; कौटुंबिक कार्यक्रमात भेट
Eknath Shinde Shivsena Reaction on Raj Uddhav Meet
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
mp Sanjay raut house recce
संजय राऊत यांच्या घराची रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
Raj Thackeray On kalyan society dispute
Kalyan Society Dispute : कल्याण मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट; सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हणाले, “मारहाण झाली त्याची आई-बायको…”

आणखी वाचा : Video: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ; म्हणाल्या, “सर्वाधिक आनंद याचा होता की…”

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत “राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याशी तुमचं नातं कसं आहे?” असं त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी त्या दोघांची प्रेमपत्रं पोहोचवली आहेत. मोहन वाघ यांची लेक शर्मिला या राज ठाकरे यांच्या पत्नी आहेत. मोहन वाघ यांची मी अनेक नाटकं केली असल्याने शर्मिला आणि माझ्यात चांगली मैत्री आहे. मला एक किस्सा सांगावासा वाटतो, दादरमधील मकरंद सोसायटीबाहेरील जो रस्ता आहे तिथून मी एकदा येत असताना तिथे शर्मिला आली आणि मला म्हणाली, वंदूताई मी तुझ्याबरोबर होते हं. मग मी पाहिलं तर तिचे वडील मोहन वाघ हे गेटबाहेर तिची वाट बघत होते. तेव्हा मला कळलं की हिचं काहीतरी सुरू आहे. नंतर तर त्यांच्या चिठ्ठ्या यायच्या. त्या मी पोहोचवत होते. आता ते अगदीच आमच्या शेजारी राहतात, त्यामुळे आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं असतं.”

हेही वाचा : त्वचा फाटली, ओठांचे तुकडे झाले अन्…; राज ठाकरेंनी सांगितला पत्नी शर्मिला यांच्या बाबतीत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग

दरम्यान, वंदना गुप्ते लवकरच “बाईपण भारी देवा” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. सहा बहिणींची गोष्ट या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होईल.

Story img Loader