‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. गुणी अभिनेत्री वनिता खरातही हास्यजत्रेतून घराघरात पोहोचली. लवकरच आता ती आपल्याला एका नव्या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे सरला एक कोटी, या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल आणि ओंकार भोजनेबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे.

सरला एक कोटी या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, या सोहळ्यात चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. वनिता खरातने माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली ती म्हणाली, “चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मला पहिला फोन केला होता जेव्हा मी चित्रपटाची कथा ऐकली तेव्हाच मला ती खूप आवडली, आणि माझा परममित्र ओंकार भोजने मुख्य भूमिकेत आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. चित्रपट खूप छान झाला आहे. प्रेक्षकांना वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे.”

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
Art and Culture with Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”

“तो जसा महाराष्ट्राची हास्यजत्रेत होता…” ओंकार भोजनेबद्दल ईशा केसकरने व्यक्त केली खंत

ओंकार बद्दल बोलताना ती असं म्हणाली, “त्याच्याबरोबर माझा एकही सीन नाही मात्र आम्ही पडद्यामागे खूप धमाल केली. मी याच दिवसाची वाट बघत होते कधी एकदा त्याचा चित्रपट येईल कारण हास्यजत्रेत आपण त्याचे टॅलेंट बघितले आहे आता चित्रपटात त्याच वेगळं टॅलेंट नक्कीच बघायला मिळेल.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

या चित्रपटात ओंकार भोजने, इशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे. तर ओंकार व ईशासह छाया कदम चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसतील. २० जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.