‘जय मल्हार’ या मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मनोरंजन सृष्टीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त देवदत्तने या चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर केलं. यावर कमेंट करत सर्वजण त्याच्याबद्दल वाटणारं कौतुक व्यक्त करत आहेत. अशातच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज नागराजने ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर केल्यावर त्याचे चाहते, मनोरंजन सृष्टीतील त्याचे मित्रमंडळींनी त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्ष काम करत उत्तमोत्तम भूमिका साकारणारी चतुरस्त्र अभिनेत्री वीणा जामकर हिने देवदत्तसाठी खास पोस्ट लिहिली. तर या पोस्टमधून देवदत्त तिचा भाचा असल्याचा खुलासा तिने केला सांगितलं.

आणखी वाचा : “मस्जिदचा मौलवी वाटतोय…”; देवदत्त नागेच्या ‘आदिपुरुष’मधील लूकवर टीका करणाऱ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला, “काही चुकीचे…”

वीणाने ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील देवदत्तचं पोस्टर शेअर करत लिहीलं, “आज मला एक बात सांगायची आहे… हा हनुमान, अ‍ॅक्टर देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी..पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते ‘जय मल्हार’ च्या सेटवर.. कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही. अतिशय मेहनत, जिद्द आणि त्याच्या शरीरयष्टीसारखीच बलदंड इच्छाशक्ती.. ह्यांच्या जोरावर देवदत्त यशाची शिखरं चढतो आहे आणि चढतच राहिल…! त्याचा खूप अभिमान वाटतो.”

हेही वाचा : Video: अजय देवगणमुळे ‘तान्हाजी’ १३० कोटी लोकांपर्यंत पोहोचणार- देवदत्त नागे

पुढे तिने लिहीलं, “तो फक्त अ‍ॅक्टर म्हणून नाही तर एक अतिशय नम्र, हुशार असा कुटुंबातला एक सदस्य म्हणून सुद्धा! मी एकतरी मालिका करावी म्हणून मला सतत motivate करत राहिला आणि तिथेच न थांबता आता तो माझा mentor आहे! मला काहीही अडचण आली की ‘देवा’ माझ्या मदतीला हजर असतो.. माझा इतका छान भाचा मला माझ्या लहानपणीच भेटायला हवा होता…म्हणजे लुटूपुटूची ‘मावशी – भाच्याची’ जोडी गणपतीत खूप खेळली असती…असो. आज सकाळी हनुमान जयंतीच्या इतक्या सुंदर, अद्भुत शुभेच्छा मिळाल्या…! काय अप्रतिम पोस्टर आहे!!! अजून कोण बनू शकला असता ‘ हनुमान ‘?? बालम ( त्याचं घरातलं नाव) We are so so proud of you!!!! तुझ्या जिद्दीला सलाम तुझी सगळी सगळी स्वप्न पूर्ण होवोत अशी मन:पूर्वक प्रार्थना…आदिपुरुषसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!” आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली असून नेटकरी त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress veena jamkar revealed that devdatta nage is her nephew in real life rnv