मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. अभिनयाबरोबर तिच्या सौदर्याचे सगळीकडे कौतुक होतं. प्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान प्रियाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर झाला असून या फोटोची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
हेही वाचा- “मी फक्त सिनेमापुरत्या गाड्या चालवतो, कारण…”, अभिनय बेर्डेचा खुलासा; म्हणाला, “माझ्या आईने…”
प्रिया व उमेश सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी ते परदेशात गेले आहेत. दरम्यान प्रिया तिच्या सहकलकारांबरोबर ऑस्ट्रेलियात धम्माल मस्ती करताना दिसत आहे. प्रियाने याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. स्विमिंग पूलमधला प्रियाचा बिकनीतला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रियाबरोबर उमेश कामत, पल्लवी अजय व आशुतोष गोखले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत प्रियाने लिहिलं “गरम ऋतूत हॉट लोकांबरोबर”
प्रियाच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काहींनी प्रियाच्या या हॉट लूकचे कौतुक केलं आहे. तर काहींनी या लूकवरुन तिला ट्रोलही केलं आहे. एका चाहतीने बिकनी सारखे फोटो टाकू नकोस अशी कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये लिहिलं “नको ना एवढं नाही बघवत तुझी गोड इमेज तशीच राहूदे” तर दुसऱ्याने “बॉलीवूड लोकांसारखे ओव्हर अॅक्टिंग करायला जाता पण ते तुम्हाला शोभत नाही जरी करायला गेलात तरी लोकांना कशासाठी दाखवता..?” अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा- शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
प्रिया बापटच्या कामाबाबत बोलायचं झालं तर नुकतचं तिच जर तरची गोष्ट नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकात प्रियाबरोबर, उमेश कामत, पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाच्या निमित्ताने उमेश-प्रिया यांची जोडी जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे.