आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपट आजपासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या आणि या समस्येला सामोरे जाणारे हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर ‘पाणी’ चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा, नेहा बडजात्या यांनी सांभाळली आहे. नुकताच आदिनाथ कोठारेने ‘पाणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पाणी’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने आदिनाथ कोठारे आणि रुचा वैद्यने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही किस्से सांगितले. चित्रीकरणाच्यावेळी कुलरच्या पाण्यात अंघोळ केल्याचं आदिनाथने सांगितलं.

हेही वाचा – “अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही”, अतुल परचुरेंच्या आठवणीत मिलिंद गवळी भावुक; पोस्ट करत म्हणाले, “तो हतबल झाला…”

आदिनाथ कोठारे म्हणाला, “मराठवाडा असल्यामुळे तिकडे पाण्याची समस्या होणार, तिकडे काही नळाला सारखं सारखं पाणी येत नाही, हे माहितच आहे. जेव्हा आम्ही सकाळी चित्रीकरणासाठी उठायचो तेव्हा नळाला पाणीचं नसायचं. मग आम्ही सगळे कुलरच्या पाण्यात अंघोळ करून चित्रीकरणाला जायचो, असे पण दिवस बघितले आहेत. म्हणजे आम्ही मराठवाडा आणि मराठवाड्यातील माणसांचं आयुष्य जगत होतो, बघत होतो, अनुभवत होतो. मला वाटतं तो अनुभव, ती जाणीव सगळ्या कलाकारांमध्ये रुजत होती.”

हेही वाचा – Bigg Boss 18: हृतिक रोशनची लाइफ कोच सारा अरफीन खान भडकली, स्वतःला मारत म्हणाली, “दोन वेळा गर्भपात अन्…”

हेही वाचा – “बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली…

दरम्यान, ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्यसह सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. या चित्रपटाचं शीर्षकगीत ‘नगं थांबू रं’ सध्या सगळ्यांच्या ओठांवर आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adinath kothare bathed with cooler water during the shooting of paani movie pps