अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आज मराठी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तर आता त्याने एका मुलाखतीत दिलेलं एक उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.
आणखी वाचा : आदिनाथ कोठारेचं शिक्षण किती माहितेय? अभिनेत्याची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
आदिनाथ सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असतो. तर आता एका मुलाखतीत त्याने आतापर्यंत कधी पब्लिक प्लेसवर किस केलं आहे का? याचा खुलासा केला आहे.
‘लोकमत फिल्मी’ला त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्याला त्याच्या आयुषयाबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत तू कधी सार्वजनिक ठिकाणी किस केलं आहेस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला त्याचं उत्तर देत तो म्हणाला, “भारतात नाही केलं. भारताबाहेर केलंय.” त्यामुळे आता आदिनाथने दिलेल्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.