मराठी चित्रपटसृष्टीतील आदिनाथ कोठारे व उर्मिला कोठारे ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांना जिजा ही मुलगीही आहे. आदिनाथने नुकतंच त्याच्या लाडक्या लेकीसह मुंबईतील प्रसिद्ध अशा जिजामाता उद्यानाला भेट दिली. ‘राणीची बाग’ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. बालदिनाच्या निमित्ताने आदिनाथने लेकीबरोबरचा राणीबाग सफारीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जिजाबरोबरच्या या व्हिडीओचा काही भाग शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिनाथ लाडक्या लेकीसह राणीच्या बागेची सफर करताना दिसत आहे. जिजाही जिजामाता उद्यानात मुक्तपणे विहार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, राणीच्या बागेतील प्राण्यांची नावे सांगतानाही व्हिडीओमध्ये ती दिसत आहे. पाणगेंड्याला बघताना आदिनाथने जिजाला “हा कोणता प्राणी आहे?” असं विचारल्यावर त्यावर लगेचच तिने ‘हिप्पो’ असं उत्तर दिलं.
हेही वाचा >> महेश बाबूचे वडील दाक्षिणात्य सुपरस्टार कृष्णा यांना श्वसनाचा त्रास, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
हेही वाचा >> Bigg Boss Marathi 4 : रोहितच्या गर्लफ्रेंडऐवजी रुचिरा होऊन खेळली असतीस तर…
हेही पाहा >> Photos: नऊवारी साडीतील मराठमोळा लूक ते गॉगलची फॅशन, प्राजक्ता माळीचे बालपणीचे फोटो पाहिलेत का?
आदिनाथ लाडक्या लेकीबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. आदिनाथने शेअर केलेल्या बाप-लेकीच्या गोड व्हिडीओंना चाहत्यांनकडूनही पसंती मिळताना दिसते. आदिनाथने शेअर केलेल्या राणीच्या बागेतील व्हिडीओवरही चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.