अभिनेता आदिनाथ कोठारेने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालपणापासूनच त्याने इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. आदिनाथ सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिनाथ लवकरच आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज नेमकं काय असेल याचा खुलासा अभिनेता १ डिसेंबरला करणार आहे. “१ डिसेंबरला कळणार ५ जानेवारीची गंमत आणि ५ जानेवारीला कळणार आता कोणाचा नंबर…stay tuned!” अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : ४७ वर्षीय रणदीप हुड्डा गर्लफ्रेंडबरोबर अडकला विवाहबंधनात! मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडलं लग्न

आदिनाथ १ डिसेंबरला नेमकी काय घोषणा करणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता माधुरी दीक्षित यांच्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पंचक’ चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. तसेच ही सरप्राईज पोस्टसुद्धा ‘पंचक’च्या निमित्ताने केली असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याच्या पोस्टवर “कोणता चित्रपट असेल?”, “आम्ही खूप उत्सुक आहोत सर” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम संजनाचा आनंद गगनात मावेना! ‘अशी’ झाली हेमा मालिनींबरोबर ग्रेट भेट, अनुभव सांगत म्हणाली…

दरम्यान, आदिनाथच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मराठीत शेवटचा तो २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये अभिनेत्याने अमृता खानविलकरबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती. यानंतर त्याने ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बजाओ’ या हिंदी सीरिजमध्ये काम केलं होतं. काही दिवसांपूर्वीच आदिनाथने ‘पंचक’ चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्यासह ‘पंचक’ चित्रपटात अभिनेत्री दिप्ती देवी प्रमुख भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित व तिचे पती श्रीराम नेने करणार आहेत.