मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चार दशकांहून अधिक काळ चित्रपट, नाटक, मालिका या माध्यमांतून जयंत सावरकर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. एकदा जयंत सावरकर यांना त्यांच्या पत्नीने मोलाचा सल्ला दिला होता. तो सल्ला घेऊनच ते आयुष्यभर चालत राहिले. सावरकर यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
जयंत सावरकर म्हणाले, “मी नोकरी सोडून पूर्णवेळ नाटक करण्याचा विचार करतो होतो. मी हा विचार माझ्या बायकोसमोर मांडला. तेव्हा माझी बायको मला मोलाचा सल्ला दिलेला. ती म्हणालेली, नाटक हा तुम्हाला आवडणारा व्यवसाय असेल तर जरुर त्यात लक्ष घाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट इथं रोखीने करा उधार काही घ्यायचं नाही. मिळालेले पैसे घरातच आणून द्यायचे. ही गोष्ट मी कबूल केली आणि नाट्यक्षेत्रामध्ये माझा पूर्णवेळासाठी प्रवेश झाला.”
हेही वाचा- “ज्येष्ठ आणि चतुरस्त्र…”, जयंत सावरकरांच्या निधनामुळे प्रसिद्ध मराठी अभिनेता भावुक
दरम्यान, जयंत सावरकर यांच्या निधनाची माहिती मुलगा कौस्तुक सावरकर यांनी दिली. काही दिवसांपासून ते आजारी होते. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि आज जयंत सावरकर यांनी अखेरचा श्वास घेतला.