केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे. मात्र अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वंदना गुप्तेंना त्यांच्या आईने एक अट घातली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video : आकाश ठोसर सह्याद्रीच्या भटकंतीवर; धबधब्याखाली भजी बनवत मारला ताव

वंदना गुप्ते यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांचं बालपण पुण्यात गेलं. वंदना गुप्ते यांच्या आई माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या घरात कलाक्षेत्राशी निगडीत वातावरण होतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर करा पण तुमचं शिक्षण पदवीपर्यंत झालंच पाहिजे अशी अट घरच्यांनी घातली होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वंदना गुप्ते यांनी तीन वर्ष गाण्याच प्रशिक्षण घेतलं होतं. पण त्यांना त्यात फारसा रस नव्हता.

एकदा वंदना गुप्तेंना नाटकात अभिनय करणार का अशी विचारणा झाली. मी अभिनय करुन पाहिन तुम्हाला वाटलं तर मला नाटकात घ्या असं वंदना गुप्तेंनी सांगितलं. १९७१ साली त्यांनी ‘पद्मश्री धोंडिराज’ या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं. सुरुवातीला हे नाटक कुणी पाहणार नाही असं त्यांना वाटलं होतं पण काही दिवसांनंतर या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागले. त्यानंतर वंदना यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

हेही वाचा- “मी असंख्य वेळा…” ‘बाईपण भारी देवा’ बघितल्यानंतर ‘अशी’ होती शरद पोक्षेंची भावना, म्हणाले, “बायकांच्या मनात…”

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वंदना गुप्तेंच्या आईंनी त्यांना सल्ला दिला होता. आई वडिलांच्या इज्जतीला धक्का लागेल अशी कोणतीच भूमिका कराच्या नाहीत अशी अट त्यांना आईने घातली होती. वंदना गुप्तेंनीं आत्तापर्यंत आईने घातलेल्या या अटीचे पालन केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advice given to vandana gupte by her mother before entering the acting field dpj