आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो रणवीर सिंगबरोबर काम करताना दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सिद्धार्थ आता पुन्हा एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आगामी चित्रपटाबद्दल त्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘थ्री चिअर्स’ असून चित्रपट असणार आहे. “नवा दिवस, नवी भूमिका नवा चित्रपट” असा कॅप्शनदेखील दिला आहे. पारितोष पेंटर हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विजय पाटकर, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी असे कलाकार असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने कलादर्पण पुरस्कार मिळाल्याचे सांगितले होते. ‘धुराळा’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. चित्रपटांप्रमाणे सिद्धार्थ जाधव स्टार प्रवाह वाहिनीवर आता ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमातून आपल्या भेटीस येत असतो. ‘सर्कस’ चित्रपटाच्या बरोबरीने तो ‘बालभारती या चित्रपटात झळकला होता. समीक्षकांच्या या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After cirkus film failure siddharth jadhav started shooting if marathi film spg